धावडा येथे गणेश उत्सव आणी ख्वाजा गरिब नवाज उर्स निमित्त शांतता समिति बैठक संपन्न

भारत न्यूज 1 जालना जिल्हा प्रतिनिधी

भोकरदन तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेले पंचयात समिती सर्कलचे धावडा गाव असून येथे सर्व जाती-धर्माचे अठरा-पगड जातीचे लोक राहतात. या अनुषंगाने हिन्दू मुस्लीम बांधवांचे पवित्र सण सोबतच येत असल्यामुळे व सालाबाद प्रमाणे गणेश उत्सव शांतता समीतीची बैठक घेण्यात आली आहेत.

पवित्र उत्सवात हिंदू मुस्लीम किंवा जाती-धर्मामध्ये समाजात तेड निर्माण होऊन जातीय तणाव होवू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, जातिय सलोखा निर्माण व्हावा, या हेतूने पोलीस प्रशासन शांतता समितीच्यामाध्यमातून प्रयत्नशिल असते. त्या अनुषंगाने धावडा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. गणेश दराडे आणि पारध ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे, धावडा बीट जमादार प्रदीप सरडे, खरात, सुरेश पडोळ, या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सरपंच गंगुबाई बोऱ्हाडे, उपसरपंच एकबालखान पठाण, व्यापारी तथा भाजपा कार्यकर्ता मुख्तार सेट. माजीसरपंच बेलआप्पा पिसोळे, सैयद निजाम, सैयद रशीद, सैयद शोएब, ग्रामसेवक मदन ओफळकर, पंजाबराव देशमुख, डॉ. प्रमोद कुलकर्णी, पत्रकार मुस्तफाखान पठाण, विठ्ठल भोटकर, मजहरखाॅंन पठाण, विलास महाराज बोऱ्हाडे, नानासाहेब देशमुख, आश्पाकखान पठाण, यांच्यासह सर्व प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते. खेळी-मेळी च्या वातावरणात शांतता समितीची बैठक पार पडली.

सर्व समाजात व जाती धर्मात सामंजस्याचे वातावरण ठेवून आपापले पवित्र धार्मिक सणसमारंभ उत्सव आनंदाने साजरी करावे अनुचित प्रकार टाळून कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले.

 

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More

You cannot copy content of this page